शिवसेना टकसाली नेते सुधीर सुरी यांची हत्या; दोन मारेकऱ्यांनी घातल्या गोळ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना टकसाली नेते सुधीर सुरी यांची दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. गोळी लागली तेव्हा सुरी मंदिराबाहेर धरणे धरत होते. गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती आणण्यासाठी ते येथे धरणे धरत बसल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान गर्दीत त्यांच्यावर दोन मारेकऱ्यांकडून गोळी झाडण्यात आली.

गोळी लागल्यानंतर सूरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या आरोपींना अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

काही काळापासून सुरींवर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात काही गुंडांना अटकही केली होती. चौकशीत आरोपीने हा खुलासा केला.