शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; शिंदे गटात दाखल होताच नीलम गोऱ्हे यांनी बदलला सूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा भगवा हातात घेत काम केलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी प्रथम शिवसेना हि एकनाथ शिंदेचीच असून त्याबाबत कोर्टानेही निर्णय दिला असल्याचे म्हणत सूर बदलला. गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा नक्कीच ठाकरे गटासाठी एक मोठा धक्काच मानला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अशात ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचे नाव अचानक समोर आले. दरम्यान, गोऱ्हे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

शिंदे गटात दाखल झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

https://www.facebook.com/mieknathshinde/videos/236811982489426

 

विधान परिषदेतील 11 पैकी तीन आमदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाची संख्या आता वाढत चालली आहे. विधान परिषदेतील शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत नुकतेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेतील विप्लव बाजोरिया हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या गटात दाखल झाल्यामुळे विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची संख्या अजून कमी झाली आहे.

मी आज नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत करतो : एकनाथ शिंदे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनेक जण आपल्यापद्धतीने अर्थ लावत आहेत. त्यांना समाधान मान् द्या. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे मी आज नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत करतो. शिवसेना भाज युती ही किती मजबूत आहे हे आजच्या प्रसंगावरून लक्षात येते. आजचा पक्षप्रवेश ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.