आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका बातमीने शिवसेना पक्षात खळबळ माजवली आहे. सध्या शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळेच निवडणुकीपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करतील या चर्चांनी जोर झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जागांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिरूरची जागा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य म्हणजे, याच जागेसाठी आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत आढळराव पाटील यांच्याकडून किंवा अजित पवार गटाच्या कोणत्याही नेत्याकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, मध्यंतरी आढळराव पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. खरे तर, आढळराव पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून उभे राहण्याची इच्छा आहे. परंतु आता शिरूरची जागा अजित पवार गटाकडे जात असल्याने आढळराव पाटील याचं गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच, आगामी काळात पाटील अजित पवार गटात गेल्यास त्याचा धक्का शिंदे गटाला बसण्याची दाट शक्यता आहे.