Thursday, March 6, 2025
Home ताज्या बातम्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे दु:खद...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे दु:खद निधन

0
195
shivajirao deshmukh
shivajirao deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, राज्य मंत्री मंडळातले माजी मंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे काल सायंकाळी ०७ च्या सुमारास  दु:खद निधन झाले.

शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील मवाळ प्रवृत्तीचे सुसंस्कृत राजकारणी काळाच्या पडद्याआड व लोकहिताशी बांधीलकी जपणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

देशमुख हे ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जुळलेले, कष्टकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेतलेले तसेच संसदीय लोकशाही, विधिमंडळ परंपरेचा सखोल अभ्यास असलेले नेते म्हणून ते सर्वांना परिचित होते.