कराडला 28 एप्रिल ते 3 मे पर्यंत रंगणार ‘शिवपुत्र संभाजी महानाट्य’; तिकिटांचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य कराडकरांना पाहायला मिळणार आहे. कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून तसेच जगदंब क्रिएशन निर्मित, महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह 250 हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून हे महानाट्य साकारण्यात येत आहे. येत्या 28 एप्रिल ते 3 मे 2023 या कालावधीत कराडातील कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे हे सायंकाळी ६ वाजता हे महानाट्य आयोजित करण्यात आलं आहे. शिवपुत्र संभाजी’ महानाट्याला यापूर्वीच महाराष्ट्रातील अनेक शहरात प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे आपण पाहिले आहे. आता कराडकरांना हा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महेंद्र महाडिक व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली. या महानाट्यामध्ये कलाकार छत्रपती संभाजी महाराजाचा गौरवशाली इतिहास आपल्या कलेच्या माध्यमातून सादर करतील. दररोज 2 तास 30 मिनिटे हे महानाट्य चालणार आहे. यावेळी चित्त थरारक घोडेस्वारी, फटाक्याची आतिषबाजी, चित्त थरारक युदध प्रात्याक्षिके, नवीन तीन मजली भव्य रंगमंच याचे थेट सादरीकरण केले जाणार आहे.

तिकीट दर किती असणार?

या महानाट्यासाठी आकारण्यात आलेल्या तिकीट दराबाबत सांगायचं झाल्यास, विद्यार्थ्यांसाठी पहिले 2 दिवस 20 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. तर इतर लोकांसाठी तिकीट दर 300, 500 आणि 1 हजार रूपये असे असणार आहे. सर्व शिवप्रेमींनी सर्वांनी संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य पहावे. असे आवाहन यावेळी डॉ. अमोल कोल्हे व महेंद्र महाडिक यांनी केले आहे