Satara News : फडणवीसांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना या फडतूस शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फडणवीसांवरील टीकेवर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा आहे. फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर जावे लागल्यामुळे ते बोल्ट असावे, असे शिवेंद्रराजेंनी म्हंटले आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष नेतृत्वाबद्दल अशी वक्तव्य करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व सातारकर या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. अशी वक्तव्य ठाकरेंनी थांबवावी अन्यथा त्यांना त्या त्या भाषेमध्ये तेही उत्तर देऊ शकतात परंतु अशी आमची परंपरा नाही. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य थांबवावी.

तुम्हाला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. परंतु त्यावेळी तुमची कुठेही जायची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारलं तसेच तुमच्या आमदारांनी सुद्धा तुम्हाला नाकारले आहे. त्यामुळे दुसऱ्यांना फडतूस म्हणून तुमचा नाकर्तेपणा लपणार नाही, अशी खरमरीत टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.