Shivrajyabhishek Din 2024: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…! आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनात आहेत. महाराजांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रत्येकची एक वेगळी संकल्पना असते. कुणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. त्यांच्या कार्याचे स्मरण करतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात तर कुणी गीत आणि पोवाड्यातून महाराजांना वंदन करतात. सध्याच्या डिजिटल युगात नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराजांची प्रतिमा (Shivrajyabhishek Din 2024) तयार करून महाराजांना एक अनोखे अभिवादन केले आहे. ही प्रतिमा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महाराजांची आभाळमय प्रतिमा… (Shivrajyabhishek Din 2024)
सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रतिमा ही आभाळात तयार झालेली प्रतिमा दिसते आहे. जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा दाटून येणारे काळे ढग आणि संध्याकाळच्या वेळेला केशरी रंगाने भरलेले आभाळ या दोन्हीचं कॉम्बिनेशन या प्रतिमेमध्ये दिसत असून यामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा तयार (Shivrajyabhishek Din 2024) झाली आहे. ही प्रतिमा AI च्या मदतीने तयार केली आहे. मात्र पाहताक्षणी तुम्हाला ही प्रतिमा नक्की आवडेल यात शंका नाही. यापूर्वी देखील शेतामध्ये तयार केलेली भव्य प्रतिमा, धान्यांपासून तयार केलेली प्रतिमा खिळ्यांपासून तयार केलेली प्रतिमा आपण पाहली असेल पण AI द्वारे तयार केलेली ही प्रतिमा सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहे.
shivaji_maharaj_history या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे की “आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. हरहर महादेव ” शिवाय या पोस्ट वर अनेक कमेंट्सही आल्या आहेत एका युजर ने लिहले आहे. “खूप गरज आहे आम्हाला तुमची महाराज” दुसऱ्या एका युजरने दिलेला आहे की “हा फोटो आर्टिफिशल इंटेलिजन्स चा टूल वापरून बनवलाय (Shivrajyabhishek Din 2024) पण काय फरक पडतो आपले राजे सगळीकडे आहेत”. अनेकांना हा फोटो आवडला असून अनेकांनी “जय शिवराय” व “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोष कमेंट बॉक्समध्ये केला आहे.