Sunday, February 5, 2023

पुण्यात राहतोय की पाण्यात? सामनातून भाजपला झोडपले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात धुव्वाधार पाऊस पडत आहे.  राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एकूण परिस्थितीवरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपला झोडपले आहे. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकराची स्थिती या आठवडयातील मुवाधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे 125 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरश वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुवलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाणी पळवाटावरून ते पळ काढीत आहेत. असं सामनातून म्हंटल .

- Advertisement -

सोमवारी पुण्यात झालेला पाऊस अचानक आला. कमी वेळात जास्त कोसळला हे खरे असले तरी तो अतिप्रचंड वगैरे म्हणता येणार नाही, तरीही पुण्याच्या तथाकथित विकासाचे रस्त्यारस्त्यावर जलार्पण झाले. पुणे महापालिकेत सत्ता राबविणाया भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले, मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते सोमवारच्या पावसाने दाखविले असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.

पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील पुराच्या परिस्थितीचे खापर पावसावर फोडले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’ असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले. पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? असा सवाल करत फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार सामनातून घेतला आहे.

आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात या समाजमाध्यमावर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने। मिरविणाऱ्या या स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाणउतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे! असं म्हणत शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.