मुंबई प्रतिनिधी। जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा आरोप असलेल्या नवीन दलाल याला शिवसेनेने निवडणुकीचे तिकीट दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खालिदवर गोळीबार करण्याचा आरोप असणाऱ्या नवीनला तिकीट दिले आहे. येथील बहादुरगड मतदारसंघातून नवीन शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.
‘मी सहा महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवाद आणि गौ संरक्षण हे माझे धोरण आहे,’ असं स्वत:ला गौरक्षक म्हणावणारा नवीन सांगतो. ‘राष्ट्रवाद, गाईंचे संरक्षण आणि आपल्या क्रांतीकारांना ओळख मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे,’ असं नवीनने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भाजपा आणि काँग्रेस सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, शहीदांचे प्रश्न, गाई आणि गोरगरिबांबद्दल कोणताही आस्था नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे अशी टीका नवीनने केली आहे. नवीनला तिकीट देण्यात आल्याच्या वृत्तावर हरिणायातील दक्षिण विभागाचे शिवसेनेचे प्रमुख विक्रम यादव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ‘नवीन गौ संरक्षण, देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे काम करत आहे, म्हणून आम्ही त्याची निवड केली आहे,’ असं यादव सांगतात.
१३ ऑगस्ट २०१८ रोजी दर्वेश सापूर आणि नवीन दलाल या दोघांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे उमर खालिदवर गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर हे दोघे घटनास्थळावरुन पळून गेले होते. संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये खालिदवर या दोघांनी गावठी पिस्तुलने उमरवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र सुदैवाने खालिदने तेथून पळ काढल्याने तो बचावला. खालिदवर गोळीबार करुन पळणारा नवीन हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
इतर काही बातम्या –
भारत भगवा करायचाय म्हणूनच युतीमध्ये तडजोड केली; काय लावायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ?@ShivSena @OfficeofUT @NCPspeaks @Awhadspeaks @INCMumbai#hellomaharashtra
https://t.co/P7aO3NoRgr— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
सेना-भाजपाला बंडखोरांचा फटका? ३० जागांवर विरोधकांना फायद्याची शक्यता!
वाचा सविस्तर – https://t.co/dVQSsTTK6u@BJP4India @BJP4Maharashtra @ShivsenaComms @ShivSena #mahayuti#MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा
वाचा सविस्तर – https://t.co/Hiw8XFeiY3@NCPspeaks @MumbaiNCP @INCIndia @AshokChavanINC #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019