शिंदे गटाची मोठी खेळी!! उत्तर-पश्चिम मुंबईमधून रविंद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहिलेले उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) विरोध रवींद्र वायकर अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे उद्याच रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

आज शिवसेनेने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन एक पोस्ट शेअर करत वायव्य मुंबई मतदारसंघातून रविंद्र वायकर यांना तिकीट देण्यात आले असल्याचे सांगितले आहे. ज्यात शिवसेनेने म्हटले आहे की, “लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा”

दरम्यान, शिंदे गटाकडून वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे करण्यात आलेले रविंद्र वायकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नेते आहेत. या दोघांनावर ईडीने वेगवेगळ्या गैरव्यवहार प्रकरणी आरोप लावले आहेत. परंतु यात रविंद्र वायकर हे शिंदे गटात सामील झाल्यापासून ते ईडीच्या चौकशीतून सुटले आहेत. मध्यंतरी रविंद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. आता यात ठाकरे गटाने विरोधात शिंदे गटाने रविंद्र वायकर यांना उभे केले आहे.