महायुतीत शिवसेना लढणार तब्बल इतक्या जागा; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ठोस आकडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगूल वाजले आहे. परंतु अजूनही महायुतीत (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र अशा स्थितीतच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीमध्ये शिवसेना पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल? यातील किती जागा मुंबईसाठी असतील? याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंचा गट लोकसभा निवडणुकीत 16 जागा लढवणार आहे. यातील 3 जागा मुंबईत लढणार आहे. ही माहिती एकनाथ शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

एकनाथ शिंदेंनी या मुलाखतीत सांगितले आहे की, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकूण 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील 3 जागांवर मुंबईत लढणार आहे. आता महायुतीत कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीयेत. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्ही 2019 मधल्या 42 जागा जिंकण्याचा रेकॉर्ड मोडू”

उद्धव ठाकरेंवर टीका

तसेच, “मुख्यमंत्री बनण्याच उद्धव ठाकरेंच स्वप्न होतं. महाविकास आघाडीची स्थापना हे सर्व पूर्वनियोजित होतं. वडिलांप्रमाणे किंग मेकर बनण्यात नाही, तर उद्धव ठाकरेंना किंग बनण्यात इंटरेस्ट होता. महाविकास आघाडीत मंत्री म्हणून काम करताना सतत अपमानास्पद वागणुकीचा अनुभव आला. यात राज्यसभेसाठी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत डावलल्यानंतर अखेर संयम संपला” असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, “जून 2022 साली सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचले होते. भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच महाविकास आघाडीच प्लॅनिंग होत” असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला.