शोएब अख्तरने निवडली ऑल टाइम बेस्ट 11 ; रोहित- विराटला स्थान नाहीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्राणघातक गोलंदाजीने फलंदाजांचे कंबरडं मोडणाऱ्या रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आपल्या ऑल टाइम बेस्ट 11 संघ निवडला आहे. अख्तरने आपल्या संघात भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी ४ खेळाडूंचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २ खेळाडूंचा आणि वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला त्याने आपल्या संघात स्थान दिले आहे. खास बाब म्हणजे अख्तरच्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि बाबर आझम यांचा मात्र समावेश नाही.

शोएब अख्तरने आपल्या संघात ज्या चार भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे त्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, कपिल देव आणि एमएस धोनचा समावेश आहे . तसेच पाकिस्तानच्या इंझमाम उल हक, सईद अन्वर, वसीम अक्रम आणि वकार युनूस या चार खेळाडूंना त्याने आपल्या संघात स्थान दिले आहे. याशिवाय ॲडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अख्तरने आपल्या संघात वेस्ट इंडिजचा खेळाडू गॉर्डन ग्रीनिजचाही समावेश केला आहे. बाकी इतर कोणत्याची संघातील खेळाडूला अख्तरने आपल्या ऑल टाइम बेस्ट ११ संघात जागा दिलेली नाही.

शोएब अख्तरने सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. सचिनच्या साथीला वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज गॉर्डन ग्रीनिज सलामीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर इंझमाम उल हकची निवड करण्यात आली असून पाकिस्तानचाच डावखुरा खेळाडू सईद अन्वर चौथ्या नंबरवर येईल. भारताचा सर्वोत्तम कर्णधार असलेल्या महेंद्रसिंघ धोनीला अख्तरने पाचव्या नंबर साठी पसंती दिली आहे. धोनी नंतर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट ६ व्या नंबर फलंदाजीला येईल. भारताला २०११ चा वर्ल्ड कप जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला सातव्या क्रमांकावर निवडलं आहे. शोएब अख्तरने वसीम अक्रम, वकार युनूस आणि कपिल देव यांच्याकडे तेज गोलंदाजीची धुरा दिली आहे तर ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न एकमेव स्पिनर संघात आहे.

शोएब अख्तरची ऑल टाइम बेस्ट 11 –

सचिन तेंडुलकर, गॉर्डन ग्रीनिज, इंझमाम उल हक, सईद अन्वर, महेंद्रसिंघ धोनी, ॲडम गिलख्रिस्ट, युवराज सिंग, वसीम अक्रम, वकार युनूस , कपिल देव , शेन वॉर्न