व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला लागला गळफास, विरारमधील मन हेलावून टाकणारी घटना

विरार :हॅलो महाराष्ट्र – विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला घाबरवण्याच्या नादात (scare her wife) पतीला गळफास लागला आहे. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

काय घडले नेमके?
विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील वीर सावरकर मार्ग परिसरातील लक्ष्मीनिवास या ठिकाणी सात दिवसांपूर्वीच मयत भगवान रामजी शर्मा वय वर्ष 35 आणि त्याची पत्नी चांदणी देवी वय वर्ष 25 हे राहायला आले होते. हे दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते. पत्नी चांदणी देवी यांनी पती रामजी शर्मा यांच्याकडून दोन हजार रुपये उसणे म्हणून घेतले होते. त्यातून त्यांनी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले होते. परंतु तिने केवळ 1500 रुपये परत केले आणि 500 रुपये नंतर देते असे सांगितले.

याच गोष्टीचा राग आल्याने पतीने पत्नीने घेतलेले नवीन कपडे फाडून आत्महत्या करण्याची धमकी देत, नवीन कपड्यातील एक कपडा घेऊन बेडरूम मध्ये जाऊन गळफास लावून घेण्याचा बनाव (scare her wife) आणत असतानाच फास लागून त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ झाला पती दरवाजा उघडत नसल्याचे पाहून पत्नीने शेजारच्यांना बोलावून दरवाजा तोडला असता सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेची विरार पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली.

हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार