Sunday, January 29, 2023

काय म्हणावं याला…रिक्षात एक नाही दोन नाही तर तब्बल 19 प्रवासी; पोलिसही गेले चक्रावून

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर अनेक प्रकारचे भन्नाट व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. असाच एक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे वाहतूक पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका रिक्षात रिक्षाचालकाने एक नाही दोन नाही तर तब्बल 19 जणांना बसवले होते. त्या रिक्षात असलेल्या प्रवाशांना पाहताच पोलिसही चक्रावले आहे.

सध्या सोशल मीडियावर रिक्षा चालकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून मध्य प्रदेश पोलिसांच्या सिधी जिल्ह्यातील आहे. भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये “अधिक राईड्स…” असे त्यांनी लिहिले आहे.

- Advertisement -

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की भरधाव वेगाने रस्त्यावर कुठेतरी रिक्षा जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसलेले दिसतात. काही जण तर मागे लटकत आहेत. त्यांना पाहताच पोलीस संबंधित रिक्षा थांबवतात.

यानंतर ऑटोवालयाला बाजूला घेतात आणि रिक्षातील प्रवाशांची संख्या मोजू लागतात. पोलिसांनी रिक्षातील प्रवाशांची संख्या मोजताच तेही चक्रावून जातात. वाहतुकीचे नियम मोडणारा हा व्हिडीओ 55 सेकंदांचा असून आतापर्यंत 1.6 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर जवळपास 6 हजार लोकांना तो आवडला आहे. संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओत रिक्षात तब्बल 19 जण प्रवास करत असताना दिसून येत आहेत.