हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये कधी काय पहायला मिळेल काही सांगू शकत नाही. अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास ठेवणे अशक्य होईल अशा कितीतरी घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही आजपर्यंत अनेक समुद्र जीवांचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. जे पाहिल्यानंतर समुद्रकिनारी फिरताना आणि समुद्राच्या पाण्यात खेळताना चुकून पायावरून वाळू जरी सरकली तरी भीती वाटते. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एका तरुणीसोबत असं काहीतरी घडलंय जे पाहून तुम्ही शॉक व्हाल.
काय घडलं? (Shocking Video)
समुद्रकिनारी फिरायला कुणाला आवडत नाही? शांत, निवांत समुद्राचा किनारा मनावरील ताण हलका करतो आणि त्यामुळे बरेच लोक बीचवर फिरायला जातात. समुद्रकिनारे कितीही सुंदर असले तरीही इथे फिरताना काळजी घ्यावी लागते. अनेकदा नकळत असे अपघात होतात जे फारच अनपेक्षित असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत असंच धक्कादायक दृश्य आपण पाहू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुणी मस्त फोटो काढण्याचा आनंद घेत असताना अचानक समुद्राच्या पाण्यातून सी लायन बाहेर येऊन तिला पाण्यात ओढताना दिसत आहे.
आजोबांची वाचवला नातीचा जीव
खरंतर सी लायन हा समुद्री जीव अत्यंत शांत प्राण्यांपैकी एक आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये सी लायनची वागणूक अत्यंत धक्कादायक होती. दरम्यान, या व्हिडिओत सी लायनने या तरुणीला अत्यंत वाईट पद्धतीने पाण्यात ओढले. यानंतर तिच्या आजोबांनी लगेच पाण्यात उडी घेतली आणि तिचा जीव वाचवल्याचे आपण पाहू शकतो. (Shocking Video) हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर discover.our.nature नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत सी लायनच्या वागणुकीसंबंधित महत्वाची माहितीदेखील शेअर केली आहे.
यात लिहिलंय, ‘सी लायन ह्यूमन फ्रेंडली सी क्रीचर प्राणी आहे. जो खडकाळ किनाऱ्यावर किंवा मानवनिर्मित किनाऱ्यावर राहतो. हा प्राणी सहसा आक्रमक नसतो. मात्र, प्रजनन काळात मादी सी लायन त्यांच्या प्रदेशाबाबत अधिक सतर्क आणि सावध असतात. अशा परिस्थितीत काहीवेळा ते आक्रमक असू शकतात. (Shocking Video) त्यामुळे, जर अशावेळी त्यांच्याजवळ एखादा माणूस वा इतर कोणी गेले तर आपल्याला धोका असल्याचे गृहीत धरून ते हल्ला करतात. त्यामुळे अशा प्राण्यांना पाहताना त्यांच्यापासून विशिष्ट अंतर ठेवा. विशेषत: त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अधिक काळजी घ्या आणि दिलेल्या सूचनांचे पालन करा’.