Shocking Video : अंधश्रद्धेचा कहर!! सर्पदंशानंतर मृतदेह गंगेत लटकवला; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आपल्या भारतात ठिकठिकाणी विविध जाती जमातीचे लोक राहतात. जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या अनेक रूढी आणि परंपरांचे पालन डोळे झाकून करत आहेत. समाजात आजही बरेच गैरसमज आणि अंधश्रद्धा यांचे पालन करणारे लोक आहेत. ही बाब खरंतर अत्यंत दुर्दैवी आहे. अंधश्रद्धेमूळे आजतागायत अनेक मोठ्या गंभीर घटना घडल्या आहेत. तरीही अनेक लोक याचे शिकार होत आहेत. आज तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली असताना देखील अनेक लोक अंधश्रद्धेच्या रस्त्यावर चालत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशात अंधश्रद्धेने आणखी एक बळी घेतलाय.

काय घडला प्रकार? (Shocking Video)

यूपीच्या बुलंद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे मृत झालेल्या तरुणाला जिवंत करण्याच्या आशेने त्याच्या देहासोबत केलेला धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मिळून त्याचा मृतदेह दोरीने बांधला आणि गंगेच्या पाण्यात लटकवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Shocking Video) ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंद शहर जिल्ह्यातील जयरामपूर कुठेण्या गावातील रहिवासी मोहित कुमार या मृत तरुणासोबत घडली.

गावकऱ्यांची अंधश्रद्धा

मिळालेल्या माहितीनुसार शेतात काम करताना २६ एप्रिल रोजी त्याला सापाने दंश केला होता. यानंतर तातडीने त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, उपचार घेऊन देखील त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर त्याच्या कुटुंबाने स्थानिक उपचार करणाऱ्या व्यक्तीची मदत घेतली आणि त्याचा मृतदेह गंगा नदीत २ दिवस लटकवून ठेवला. (Shocking Video) गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गंगेच्या पाण्यात मृतदेह ठेवल्यास सापाच्या विषाचा प्रभाव नाहीसा होऊन मृत तरुण जिवंत होऊ शकतो, असा एक समज आहे. म्हणूनच तब्बल २ दिवस मोहितचा मृतदेह गंगेच्या पाण्यात लटकवण्यात आला होता. या सगळ्या प्रकारानंतरही मोहित जिवंत झाला नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार केले.

या आधी देखील अंधश्रद्धेने आजपर्यंत अनेक लोकांचे जीव घेतले आहेत. मात्र, तरीसुद्धा अंधश्रद्धेच्या विळख्यात जखडलेली मानवी बुद्धी काही सुटेना! आपल्या प्रियजनांना गमावून देखील अशा लोकांची बुद्धी टाळ्यावर येत नाही याहून आणखी काय वाईट होऊ शकतं? याआधी देखील हरिद्वारमध्ये अशीच एक घटना घडली होती. (Shocking Video) एका आईने पोटच्या पोराला गंगा नदीत बराच वेळ बुडवून ठेवले होते. आपल्या मुलाचा आजार बरा होईल अशी तिची अंधश्रद्धा होती. मात्र, बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे तिचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आता सर्पदंश झालेल्या मृत तरुणाच्या देहासोबत करण्यात आलेल्या विचित्र कृत्याची घटना समोर आली आहे. जी फारच संतापजनक आहे.