नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

0
73
monali gorhe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ४४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. विशेष म्हणजे मोनाली यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच पहाटेच्या सुमारास त्यांचे वडील मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनापाठोपाठ मुलीचेही निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोनाली यांचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी मनोहर गोऱ्हे यांचे पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मनोहर गोऱ्हे यांचा सामाजिक कार्यातही पुढाकार होता. मात्र वडिलांच्या पाठोपाठ मोनाली यांचेही निधन झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली मोनाली यांनी नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली.

यानंतर त्यांनी एक्सेल शुटींग नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. मोनाली या मागच्या १० वर्षांहून अधिक काळापासून त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नाशिकच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य करत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांना अनेक वेळा गौरवण्यात आले आहे. मोनाली यांच्या माघारी आई आणि एक विवाहित बहिण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here