.. तर श्रद्धा आज जिवंत असती; वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुळींज पोलीस स्टेशन आणि मणिकपूर पोलीस स्टेशनने यापूर्वीच आम्हाला सहकार्य केलं असत तर आज माझी मुलगी जिवंत असती असं म्हणत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी थेट पोलिसांवरच आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हंटल. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्रद्धाच्या मृत्यूने आमच्या संपूर्ण कुटुंबाला दुःख झालं असून आम्ही ते कधीच विसरू शकत नाही. आत्तापर्यंतच्या तपासाबाबत दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे काम व्यवस्थित सुरु आहे. मात्र अगदी सुरुवातीस, तुळींज पोलीस स्टेशन आणि मणिकपूर पोलीस स्टेशनच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला असा आरोप श्रद्धाच्या वडिलांनी केला. याबाबत चौकशी व्हावी कारण जर त्यावेळी पोलिसांनी सहकार्य केलं असत तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा आरोपी विरोधात आणखी पुरावे मिळण्यास मदत झाली असती असं श्रद्धाच्या वडिलांनी म्हंटल.

श्रद्धाला न्याय मिळण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवं असून माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असेही विकास वालकर यांनी म्हंटल. आफताब पूनावाला याने श्रद्धाची अत्यंत क्रूरतेने हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी त्याचे कुटुंबीय आणि या कटात सामील असलेल्या अन्य लोकांचीही चौकशी व्हावी आणि सर्वाना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे.