Shreyanka Patil : पाटलाच्या पोरीचा नाद नाय करायचा; WPL 2024 घेतल्या सर्वाधिक विकेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WPL 2024 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरू ने दिल्ली कपिटल्सचा ८ विकेट्सने पराभव करत प्रथमच महिला आयपीएलवर आपलं नाव कोरल. आरसीबीच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती म्हणजे ऑफ स्पिनर श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) …. श्रेयांकाने तब्बल ४ बळी घेत दिल्लीच्या फलंदाजांची कंबरडं मोडलं. यासह श्रेयांकाने यंदाच्या वूमन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा रेकॉर्ड सुद्धा केला.

यंदाच्या महिला आयपीएल मध्ये २१ वर्षीय श्रेयंका पाटीलने 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. तिच्या या दमदार कामगिरी बद्दल तिला पर्पल कॅप आणि 5 लाख रुपये पारितोषक सुद्धा मिळाले. अंतिम सामन्यात सुद्धा जेव्हा दिल्लीच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून बंगळुरू वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रेयांकाने ३.३ षटकात १२ धावा देत चार विकेट्स घेतल्या आणि दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. आरसीबीने यंदा जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीमध्ये श्रेयांका पाटीलचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण सीजनमध्ये श्रेयांकाने (Shreyanka Patil) जबरदस्त कामगिरी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं.

WPL 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू: Shreyanka Patil

श्रेयंका पाटील- १३ बळी
आशा शोभना – १२ विकेट्स
सोफी मोलिनो – १२ विकेट्स
मेरीजेन कॅप- 11 विकेट

WPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे पाच खेळाडू:

एलिस पेरी- 347 धावा
मेग लॅनिंग- 331 धावा
शेफाली वर्मा – 309 धावा
स्मृती मानधना-300 धावा
दीप्ती शर्मा- 295 धावा