हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारत अ आणि ड संघांमध्ये सामना आहे . या सामन्यात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर (Shreyas Iyer) त्याच्या अनोख्या स्टाईलने ट्रॉलर्सचा शिकार बनला. श्रेयश अय्यर चक्क कला गॉगल घालून फलंदाजीला आला. मात्र अवघ्या ७ चेंडूंतच तो शून्यावर बाद झाला. खालील अहमदने त्याची विकेट घेतली .
आज इंडिया ड ची पहिली विकेट अवघ्या ४ धावांवर पडल्यानंतर कर्णधार श्रेयश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र त्याच्या एंट्रीनेच तो सर्वांच्या नजरेत जास्त उठून दिसला, कारण चक्क काळा गॉगल घालून श्रेयश मैदानात उतरला. आपण अनेकदा खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना गॉगल घातलेले बघितलं आहे, मात्र श्रेयश फलंदाजी साठी गॉगल घालून आल्याने सर्वानाच धक्का बसला. आज श्रेयश मोठी काहीतरी कमाल करेल असं प्रत्येकाला वाटलं. मात्र श्रेयश खेळ अवघ्या ७ चेंडूंतच संपला. खलील अहमदने त्याला बाद करत पॅव्हेलियन मध्ये माघारी पाठवलं.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) September 13, 2024
बाद झाल्यानंतर श्रेयश ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आला. अनेक यूजर्सनी श्रेयशची फिरकी घेतली आहे तर काही चाहत्यांनी मात्र त्याचं समर्थन केलं आहे. फलंदाजी करताना सूर्यप्रकाश थेट डोळ्यावर येत असल्याने काळा चष्मा घातला होता, असं काही जणांचं म्हणणं आहे. मात्र काळा गॉगल घालून सुद्धा श्रेयसला खातेही उघडता आलं नाही आणि शून्यावर आऊट व्हावं लागलं यामुळे त्याला अजूनही ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान, भारत अ आणि भारत ड यांच्यातील या सामन्यात भारत ड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारत अ संघ 84.3 षटकांत सर्वबाद 290 धावांवर आटोपला. शम्स मुलानी याने 89 आणि तनुष कोटियनने 53 धावा केल्या. याशिवाय रियान परागने 37 धावा केल्या. तर भारत डीकडून हर्षित राणाने 4, अर्शदीप सिंग आणि विद्वत कविरप्पाने 2-2 विकेट घेतल्या. सरांश जैन आणि सौरभ कुमार यांनी 1-1 विकेट घेतली. तर भारत ड चा संपूर्ण संघ अवघ्या १८३ धावांत माघारी परतला.