मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशनात मुलगा श्रीकांत भात लावणीसाठी साताऱ्यात; पहा फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा – दरवर्षी स्वतः भात लावणी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यंदा भात लावणीसाठी गावी येणे शक्य नाही. मुख्यमंत्री या नात्याने ते पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भात लावणीची जबाबदारी स्वतःवर घेत दरे तर्फ तांब या आपल्या मूळगावी येऊन भात लावणी केली.

१) खासदार श्रीकांत शिंदे यांनी यंत्राच्या साह्याने शेतात चिखलणी केली.
२) गरगरीत चिखल केल्यानंतर पाणी साचून राहण्यासाठी शेताच्या चारी बाजूंनी मातीचा बांध देखील घातला.
३) मजुरांसोबत भाताच्या तरवा काढून त्याच्या पेंढ्या बांधल्या.
४) तरवांच्या पेंढ्या शेताच्या कोपऱ्यात एकत्र ठेऊन भात लावणीला सुरूवात केली.
५) मजुरांना मदतीला घेत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भात लावणी केली.
६) मजुरांशी गप्पा मारत आणि भलरी गाण्यांचा आनंद लुटत खासदार डॉ. शिंदे यांनी भात लावणी केली.
७) जनावरांच्या गोठ्यातील देशी गाईंना चाराही खायला घातला.