श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले, केला महत्वपूर्ण खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्याचे काम सुरु असून या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टने मंदिरासाठी जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या व्यवहारावरून आता वाद निर्माण झाला आहे. या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी कागदपत्र दाखवत ट्रस्ट सचिव चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीचे नेते आणि आयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन अवघ्या काही मिनिटात दोन कोटींवरून 18.5 कोटी ना खरेदी केल्याचं म्हटलं आहेत. हे सर्व आरोप मात्र ट्रस्टने फेटाळून लावले असून त्यावर खुलासा देखील केला आहे.

आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित

यावर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी खुलासा करताना आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की,” श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत. समाजाची दिशाभूल करण्यासाठी हे केले जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर संदर्भातील मुद्द्यांवर निकाल दिल्यानंतर देशभरातून लोक आयोध्येत जमीन खरेदीसाठी येऊ लागले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले. ज्या प्लॉटची माध्यमांमध्ये चर्चा होत आहेत ती जागा रेल्वेस्थानक परिसर जवळ असलेली मोक्याची जागा आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी आतापर्यंत जमीन खरेदी केली. कमीत कमी किमतीत खरेदी केली आहे असं त्यांनी म्हटले आहे. संमती घेण्यात आल्यानंतर संबंधित कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात सर्व प्रकारचे कोट फीस आणि स्टॅम्प पेपर सर्व ऑनलाईन खरेदी केला जात आहे. जमिनीची खरेदी संमती पत्राच्या आधारावरच केली जात आहे. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जमिनीचा मोबदला विक्रेत्याच्या खात्यावर ऑनलाइन जमा केला जातो. असंही राय यांनी म्हटले आहे.

काय आहे आरोप?

दरम्यान आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील खासदार सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी जमीन खरेदी प्रकरणावरून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. ” दोन कोटी रुपयात विकत घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखांवर वाढत गेला. भारतच काय तर जगातील कुठल्याच जमिनीचा भाव इतक्या वेगानं वाढत नाही. हे उघडपणे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. मी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारकडून अशी मागणी करतो की या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी. तसंच या गंभीर भ्रष्टाचारात सहभागी असणार्‍या लोकांना तुरुंगात टाकावं. हा प्रश्न देशातील करोडो राम भक्तांचा राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टाने कमवलेले पैसे मंदिरासाठी देणाऱ्या विश्वासाचाही आहे. असा त्यांनी प्रश्न केला आहे.

Leave a Comment