वारूंजीची सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडी शर्यतीत प्रथम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली. या शर्यतीमध्ये वारूंजी येथील सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडा विजेता ठरला. शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती होती. याचबरोबर शर्यतीमध्ये विविध जिल्ह्यातील बैलगाडा सहभागी झाले होते.

बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी धाराशिव मदने, भारत पिसाळ, पवन पिसाळ, विजय साळूंके, सुरेश पाटील, शंकर पाटील, विजय साळूंखे, विक्रमसिंह पवार, संदिप पवार, रोहित डुबल व ग्रामस्थ उपस्थित होते. या मैदानाचे नेतृत्व चंद्रकांत मदने, हिंदूराव पिसाळ, निवास खोचरे, अशोक मदने, नागेश मदने, सागर कांबळे, विनोद डुबल, वैभव मदने यांनी केले.

शर्यतीमधील विजेत्या बैलगाड्या पुढीलप्रमाणे ः- प्रथम क्रमांक- सिद्धनाथ प्रसन्न (वारूंजी), द्वितीय- प्रितेश भैया (कलेढोण), तृतीय- सुधा ग्रुप (करवडी), चतुर्थ- लाला जाधव (सदाशिवगड), पाचवा- ज्योतिर्लिंग प्रसन्न (कोरीवळे), सहावा- बाळासाहेब शिंगण (कराड), सातवा- बैजया ग्रुप (तोंडोली), आठवा- कै. साई सागर कांबळे, नववा- शिवशंकर जेरी (अपेगाव) हे विजेते ठरले. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमींची यावेळी उपस्थिती होती. शर्यतीमधील विजेत्या बैलगाडा मालकांना पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, तालुका अध्यक्ष सूर्यकांत पडवळ, उपसरपंच हिंदूराव पिसाळ, निवास खोचरे, शंकर पाटील, पवन पिसाळ, नागेश मदने, रोहित डुबल आदींच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे बक्षिस वितरण करण्यात आले.