Side Effects Of Sleeping At Day | दिवसा झोपून रात्री जागरण करताय?? मग ही बातमी वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | असे अनेक लोक आहेत, जे नेहमीच म्हणत असतात की, आम्ही रात्री कितीही वाजेपर्यंत जागू शकतो. पण सकाळी लवकर उठू शकत नाही. किंवा अनेक लोक हे रात्रभर जातात आणि दिवसभर झोपतात. दिवसा झोपल्याने तुमचा रात्रीचा थकवा थोडासा कमी होतो. परंतु दिवसा जर तुम्ही जास्त वेळ झोपत असाल, (Side Effects Of Sleeping At Day) तर त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक तोटे सहन करावे लागतात. दिवसा तुम्ही 10 ते 20 मिनिटांची झोप घेणे चांगले आहे. परंतु त्यापेक्षा जर तुम्ही जास्त वेळ झोपला, तर तुम्हाला अनेक मोठे आजार देखील होऊ शकतात.

हळूहळू झोप उडते | Side Effects Of Sleeping At Day

जे लोक दिवसा झोपतात त्यांचा सगळ्यात मोठा तोटा होतो. तो म्हणजे हळूहळू त्यांची झोप कमी होते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार काही काळानंतर तुमची झोप उडते. उदाहरणार्थ तुम्ही जर रात्री 9 वाजेपर्यंत झोपत असाल, तर हळूहळू हा वेळ 11 ते 12 पर्यंत जातो. आणि नंतर नंतर 2- 3 वाजायच्या आधी तुम्हाला रात्रीची झोप येत नाही. त्यामुळे तुमची झोप कमी होते.

विज्ञानाच्या आधारावर असे म्हटले जाते की, जेव्हा अंधार पडत जातो. त्यावेळी आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन तयार होतो. जे संप्रेरक आपल्या झोपेच्या चक्राचे नियमन करत असते. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात मेलाटोनिन वेगाने तयार होते. तेव्हा आपल्याला जास्त गाढ झोप लागायला सुरुवात होते. आणि आपल्याला झोपण्याची इच्छा तयार होते. परंतु जे लोक रात्री जातात त्यांची झोप येण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यांची झोप हळूहळू कमी होते. हा हार्मोन रात्रीच्या वेळी जेवढा तयार होतो, त्या वेगाने तो दिवसा तयार होत नाही. (Side Effects Of Sleeping At Day)

लाईटचा त्याचप्रमाणे फोन, टीव्ही, लॅपटॉप, गॅजेट अशा प्रकारच्या वस्तूंचा या मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम होतो. आणि तो कमी प्रमाणात तयार होतो. म्हणून आपली हळूहळू झोप कमी होते.

दिवसा झोपल्याने होतात हे आजार

  • तुम्ही जर दिवसा जास्त वेळ झोपत असाल, तर तुम्हाला निद्रानासाची समस्या होऊ शकते. हळूहळू ही समस्या इतकी वाढत जाते की, तुम्हाला मेलाटोनीन हा हार्मोन तयार करण्यासाठी कृत्रिमरित्या औषधे घ्यावी लागतात.
  • नैराश्य, चिंता, गोंधळ, स्मरणशक्ती कमी होणे, काहीही समजण्यात अडचणी येणे, तणाव येणे या गोष्टी दिवसा झोपल्याने होतात.
  • त्याचप्रमाणे चिडचिडेपणा, शरीर थकणे, सुस्ती येणे यांसारख्या गोष्टी घडतात.
  • आपण ऑफिसमध्ये असो किंवा घरी असो कुठेही असले तरी आपले काम नीट होत नाही.
  • दिवसा जास्त वेळ झोपल्याने आणि रात्री जागरण केल्याने तुम्हाला रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, मधुमेहाचा धोका देखील चालू होतो.