व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सिद्धार्थ – कियाराचे असे दिसते नवे घर; लवकरच करणार घरात प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा यांचं नुकतंच लग्न झालं. लग्नानंतर आज रिसेप्शन पार पडणार आहे. दोघांनी आपल्या असंसाराला सुरुवात केली असून त्यांच्या नव्य घराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नव्या घराची चर्चा रंगलेली आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जे घर दिसत आहे, ते घर किआरा – सिद्धार्थ यांचं असल्याचं सांगितले जात आहे. लग्नाआधी सिद्धार्थ – किआरा नव्या घराच्या शोधात होते. अखेर दोघांना त्यांच्या स्वप्नांमधील घर मिळालं असून ते प्रचंड भव्य आणि आलिशान आहे.

सध्या सिद्धार्थ – किआरा त्यांच्या नव्या घरात राहत नसून पाली हिल याठिकाणी असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. पण लवकरच सिद्धार्थ – किआरा त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. आठवड्यापूर्वीच दोघांनी नवं घर खरेदी केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचे जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये ७ फेब्रुवारी रोजी दोघांनी शाही अंदाजात लग्न पार पाडले.

सध्या सिद्धार्थ – किआरा यांच्या रिसेप्शन सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून सर्वत्र त्यांच्या रिसेप्शनची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, रिसेप्शनमध्ये अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची आणि मुकेश अंबानी यांनी लग्नानंतर दोघांना दिलेल्या भेटवस्तूची चर्चा रंगत आहे.