औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे आता पर्यटनस्थळ त्याचबरोबर प्राणिसंग्रहालय सुद्धा बंद आहे. त्यामुळे आता लोकांची वर्दळ या ठिकाणी नसल्यामुळे आणि निवांतपणा असल्यामुळे प्राणीसंग्रहालयाला नवीन रूप देण्यात येत आहे. सध्या प्राणीसंग्रालयाची रंगरंगोटी सुरू आहे. सिद्धार्थ गार्डन येथील तुटलेले पिंजरे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. या नूतनिकरणामुळे सिद्धार्थ गार्डन मधील प्राणिसंग्रहालय सर्पालय आणि मत्सलयाला नवीन रूप निर्माण झाले आहे.
सेंट्रल झू अँँथाँरिटीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी प्राणिसंग्रहालयातील तुटलेले पिंजरे, वाकलेल्या आणि गंजलेल्या जाळ्या, खोल्यांची दयनीय अवस्था, यामुळे प्राणिसंग्रहालय हलवण्यात यावे अशी सूचना त्यांनी दिली होती. याच सूचनांची दखल घेत मनपाने सिद्धार्थ उद्यानातील सर्पालय, मत्सयालय, आणि प्राणिसंग्रहालयाची रंगरंगोटी करण्यात आली.
त्याचबरोबर पाण्याची पाईपलाईन, तसेच संरक्षित जाळ्या देखील बदलण्यात आल्या.महानगर पालिकेचे हे एकमेव उद्यान आहे. या प्राणिसंग्रहालयात बिबट्या, पट्टेदार वाघ आणि 377 प्राणी असून सर्पालय आणि मत्सालय देखील आहे. आता सध्या 28 कामे या ठिकाणी सुरू आहेत.




