Friday, March 31, 2023

सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीने घेतले 7 फेरे; पहा लग्नातील खास Photos

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड मधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळख असलेले सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आता विवाहबंधनात अडकले आहेत. काल 7 फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. या शाही लग्नाचे फोटो सिद्धार्थ आणि कियाराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sidharth malhotra kiara advani wedding photos

- Advertisement -

या फोटोंमध्ये या फोटोंमध्ये दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी गुलाबी आणि सोनेरी रंगाचे पोशाख निवडले. कियारा गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थने गोल्डन कलरची शेरवानी परिधान केली होती. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याखाली दोघांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आता आमचे कायमचे बुकिंग झाले आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही तुमच्याकडून प्रेम आणि आशीर्वाद मागत आहोत.

Sidharth malhotra kiara advani wedding photos

यातील एका फोटो मध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांकडे हात जोडलेले दिसले. यावेळी दोघेही ज्याप्रकारे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते त्यांची ती स्टाईल चाहत्यांना खूप आवडली.

Sidharth malhotra kiara advani wedding photos

दुसऱ्या एका फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या अंगठ्याही दिसत आहेत. कियाराने तिच्या डाव्या हातात हिऱ्याची मोठी अंगठी घातलेली दिसतेय आणि सिद्धार्थने ​​उजव्या हाताला सोन्याला बँड घातलेला दिसला. सिद्धार्थची अंगठी त्याच्या रुबाबदार शैलीला चांगलीच सूट झाली होती.

Sidharth malhotra kiara advani wedding photos

एका फोटोमध्ये सिद्धार्थ कियाराला किस करताना दिसत आहे. त्या फोटोत कियाराने घातलेले मंगळसूत्र आणि सिंदूरही दिसत आहे. किस करतानाचे दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होते.

Sidharth malhotra kiara advani wedding photos

सिद्धार्थ कियाराच्या लग्नाचे रिसेप्शन 9 फेब्रुवारीला दिल्लीत होणार आहे, यावेळी कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. तर दुसरे रिसेप्शन मुंबईत होणार आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील कलाकार सहभागी होणार आहेत.