आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; शरद पवारांकडून बदलांचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वावड्या उठत आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण अस्थिर वाटत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे, त्यातच अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. आता भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी मधील बदलाचे संकेत दिले आहेत.

मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते असंही पवारांनी म्हंटल. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे, पण इथले सामान्य कुटुंब टिकलं पाहिजे. यापूर्वी आपण गिरणी कामगारांची मुंबई पाहिली आहे. त्यावेळी कष्टकरी वर्ग हा मोठा होता. आज तो कष्टकरी दिसत नाही. या ठिकाणी असलेल्या गिरण्या गेल्या आहेत. तिथे मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहित नाही अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.