Sim Port | भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण अंतर्गत नवनवीन नियम नेहमीच बदलत असतात. अशातच आता सिम कार्ड संबंधित अपडेट देखील आलेले आहे. ती म्हणजे 1 जुलैपासून आता दूरसंचार वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. हा नियम एकदा लागू झाला की, अनेक लोकांना सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी सात दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही सिम कार्ड पोर्ट केल्यानंतर तुम्हाला दहा दिवस वाट पहावी लागणार होती. परंतु आता नवीन नियमानुसार केवळ सात दिवसातच तुमचे सिम कार्ड चालू होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने याबाबत असे म्हणणे आहे की, फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे.
या आधी जर एखाद्या व्यक्तीचा फोन चोरीला गेला तर एफआयआरची प्रिंट दिल्यानंतर लोकांना नवीन सिम कार्ड मिळायचे, परंतु 1 जुलैपासून असा फोन चोरीला गेला तर त्या नवीन सिम साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. aतसेच ज्यांनी सिम कार्ड बदलले आहे. त्यांनाही मोबाईल नंबर साठी सात दिवस वाट पहावी लागणार आहे.
अनेक वेळा सिम कार्ड (Sim Port) चोरीला गेल्यानंतर तो नंबर ऍक्टिव्ह केल्याच्या दिसून येते. यामुळे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी आता हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.