कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी…. तळ कोकणातील, विधानसभेचा निकाल पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तळकोकण म्हणजे राणेंचा (Narayan Rane) बालेकिल्ला.. इथं राणे पितापुत्रांनी असा काही जम बसवलाय, की सिंधुदुर्गात राणेंशिवाय इथल्या राजकारणाचं पान देखील हालत नाही असं म्हणतात.. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राणे महाविकास आघाडीच्या बाजूने वारं असतानाही मतदासंघातून मोठ्या लीडने निवडून आले.. त्यामुळे याचा इम्पॅक्ट हमखास विधानसभा निवडणुकांवर पडणार आहे.. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा इन मीन तीन विधानसभा असणाऱ्या या जिल्ह्यात नितेश राणे, दीपक केसरकर आणि वैभव नाईक(in one frame) या तिन मात्तबरांचं राजकारण दावणीला लागणार आहे.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला वैभव नाईक हे राणेंच्या आव्हानापुढं टिकतील का? नितेश राणे यांना चितपट करण्याची हिंमत कोण दाखवणार? आणि सावंतवाडीत केसरकर की भाजप? त्याचाच हा इनडेप्थ आढावा…

पहिला पाहुयात कणकवली विधानसभा…कोकणातील सर्वात जास्त हायव्होल्टेज मतदारसंघ असणारा कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला राहिलाय… भाजपच्या प्रमोद जठार यांचा 2014 ला 25 हजार मतांनी पराभव करत नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले… पण नारायण राणेंनी काँग्रेस मधून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष काढत आणि पुढे भाजपमधून राज्यसभा गाठल्याने नितेश राणेही भाजपमध्ये जाणार हे फिक्स होतं.. झालंही तसंच.. नितेश राणे यांनी छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला… त्यामुळे २०१९ ची कणकवलीच्या निवडणुक ही सर्वात जास्त अफलातून झाली.. पण राणे विरुद्ध शिवसेना या संघर्षाची झळ या मतदारसंघाला बसली आणि युती असताना नितेश राणे यांना भाजपकडून तिकीट कन्फर्म झालेलं असतानाही शिवसेनेनं सतीश सावंत यांना उमेदवारी दिली… तर काँग्रेसकडून सुशील राणे निवडणुक रिंगणात होते.. अत्यंत चुरशीच्या झालेल्या याही निवडणुकीत अखेर बाजी मारली ती नितेश राणेंनी.. यानंतर शिवसेना पक्षफुटीनंतरचा त्यांचा आक्रमक बाणा… कडव्या हिंदुत्वाची घेतलेली भूमिका… आणि लोकसभेला नारायण राणेंना कणकवलीतून मिळालेलं दमदार लीड पाहता यंदाही नितेश राणे हेच कणकवलीच्या आमदारकीचं मैदान मारतील.. उद्धव ठाकरेंच्या मशालीकडून सतीश सावंत हे निवडणुक मैदानात दिसतील..

YouTube video player

दुसरा मतदारसंघ येतो तो कुडाळचा… तळ कोकणात 2014 मध्ये नारायण राणेंना पराभवाचा झटका देत जायंट किलर ठरलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा हा बालेकिल्ला… राणेंसाठी हा पराभव मानहानीकारक होता… एवढच नाही तर यामुळे राणे कुटुंबाची काही काळ राजकारणातून पीछेहाटही झाली होती… याचाच वचपा काढण्यासाठी 2019 मध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांना राणेंनी ताकद दिली… पण राणेंच्या नाकावर टिच्चून वैभव नाईक यांनी तब्बल 14 हजारांच्या लीडने दणक्यात विजय मिळवला… यानंतर शिवसेनेच्या बंडानंतरही वैभव नाईकांनी ठाकरें सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने राणे आणि वैभव नाईक यांच्यातला विस्तव आणखीनच वाढलाय… यानंतर राणे पितापुत्रांनी ठाकरे गट कोकणातून संपल्याची केलेली भाषा… आणि निलेश राणे यांनी कुडाळातून वैभव नाईकांचा बंदोबस्त करण्यासाठी तापवलेलं राजकारण यामुळे कुडाळची जागा सध्या ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनलीय… वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी वैभव नाईकांच्या विरोधात निलेश राणे यंदा मैदानात उतरणार असल्याचं वातावरण आधीच कुडाळमध्ये तयार झालय… नाईकांनीही हिम्मत असेल तर माझ्यासमोर लढून दाखवा, असं राणेंना ओपन चॅलेंज देऊन कुडाळचं राजकारण आणखीनच इंटरेस्टिंग बनवलंय… पण लोकसभेला नारायण राणेंना कुडाळमधून मिळालेलं लीड पाहता वैभव नाईकांसाठी पर्यायाने ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे…(with) नाईकांनी कुडाळमधून लीड न मिळाल्याने विनायक राऊतांची जाहीर माफीसुद्धा मागितलीय… नारायण राणे केंद्रात मंत्रीपदी असताना… नितेश राणे विद्यमान आमदार असताना… आता एकाच घरातील तिसऱ्या उमेदवाराला कुडाळ मधून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजप घेईल का? की शिंदे गट (logo) या जागेसाठी अडून बसेल? यावरही बरीचशी समीकरणे अवलंबून असणार आहेत… पण महाविकास आघाडीकडून वैभव नाईक यांचं नाव फिक्स असलं तरी महायुतीकडून कुठलाही उमेदवार रिंगणात उतरला… तर त्याला राणे पिता पुत्रांकडून रसद पुरवली जाणार, असं सध्या इथलं चित्र आहे… त्यामुळे 2019 प्रमाणे यंदाही कुडाळची जागा हॉट सीट असणारय…

तिसरा मतदारसंघ सावंतवाडीचा…2009 ला राष्ट्रवादीकडून तर त्यानंतर सलग दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर आमदार होण्याचा मान दीपक केसरकरांना मिळाला… मातोश्रीतील त्यांची उठबस पाहता त्यांना ठाकरेंच्या जवळचे समजलं जायचं…पण शिवसेनेच्या बंडात ते शिंदें सोबत गेले… नुसते गेले नाहीत तर शिंदे गटाची बाजू प्रभावीपणे मांडताना त्यांनी ठाकरेंनाही चांगलंच फैलावर घेतलं… सावंतवाडीतून केसरकर जरी शिंदे गटात गेले असले तरी इथल्या कार्यकर्त्यांचा केडर बेस आजही ठाकरेंच्या बाजूने असल्याने येत्या निवडणुकीला त्याचा केसरकारांना फटका बसू शकतो, असं बोललं जात होतं… हेच समीकरण लक्षात घेऊन लोकसभेला नारायण राणे यांचा प्रामाणिकपणे काम करत त्यांना मतदारसंघातून निर्णायक लीड मिळवून दिलं… काही दिवसात तयार झालेली का होईना पण केसरकरांनी राणेंसोबत केलेली मैत्री निभावलीच… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला केसरकरांना राणे मदतीचा हात देण्याची शक्यता आहे… पण भाजपच्या राजन तेली यांनी उमेदवारीसाठी केसरकरांच्या विरोधात आघाडी उघडल्याने आणि त्यातही संजू परब उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने तिकीट वाटपाचा मुद्दा हा महायुतीच्या पराभवाचं कारण ठरू शकतो, यात दीपक केसरकर यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा विचारही केला जाऊ शकतो…दुसऱ्या बाजूला आघाडी नसली तरी सावंतवाडीतून राऊतांना लोकसभेला मिळालेलं मतदान पाहता आजही शिवसैनिकांची फौज ठाकरेंच्या बाजूने दिसतेय… त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटणार हे तर कन्फर्म आहे… पण केसरकर यांना यंदाची आमदारकी भाजप आणि ठाकरे गटाच्या विरोधामुळे चांगली जड जाणार आहे, एवढं मात्र नक्की…