प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश; म्हणाल्या, सनातनाशी खोलवर संबंध..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज(शनिवारी) दुपारी ठीक 3 वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यापूर्वीच सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी भाजपमध्ये (Bhartiy Janata Party) प्रवेश केला आहे. आज दुपारच्या वेळी अनुराधा पौडवाल या भाजप कार्यालयामध्ये आल्या होत्या. याचवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल असे म्हटले जात आहे.

अनुराधा पौडवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे की, “मला आनंद होत आहे की आज मी अशा लोकांमध्ये सामील होत आहे, ज्यांचा सनातनाशी खोलवर संबंध आहे. चित्रपटसृष्टीत गायल्यानंतर मी भक्तीगीतेही गायली आहेत. रामललाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे गाण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे.” मुख्य म्हणजे, ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पौडवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

अनुराधा पौडवाल कोण आहेत?

अनुराधा पौडवाल या एक लोकप्रिय गायिका आहेत. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी कर्नाटकातील एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांनी 1973 साली आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी अभिमान चित्रपटात श्लोक गायला होता. यानंतर 1973 मध्ये त्यांनी यशोदा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलगू, उडिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी अशा अनेक भाषांमध्ये 9,000 हून अधिक गाणी गायली. आजवर त्यांनी 1,500 हून अधिक भजने ही रचली आहेत.