हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवायचे असेल तर आजच्या युगात गुंतवणूक अत्यंत गरजेची आहे. कारण, आज केलेली गुंतवणूक ही उद्या तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना खात्रीशीर सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे गुंतवणूक काळाची गरज आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुंतवणूक करतेवेळी सगळ्यात आधी लक्षात घेतली जाते ती सुरक्षा आणि मिळणारा परतावा. ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला चांगला आणि अधिक परतावा मिळेल त्या योजनेत गुंतवणूक करणे पसंत केले जाते. अनेक लोक त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग बचत करता यावा यासाठी गुंतवणूक करतात. पण निश्चित परताव्याचे लक्ष्य फार कमीच लोक साध्य करू शकतात.
तुमच्याही बाबतीत असेच होत असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. कारण तुम्हालाही चांगला परतावा मिळवून तुमच्या गुंतवणुकीद्वारे चांगली कमाई करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडणे गरजेचे आहे. (SIP Investment)जसे की, SIP. याच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता. अतिशयोक्ती वाटत असेल तर करोडपती होण्यासाठी कोणते नियम फॉलो करावे लागतात ते आधी जाणून घ्या. म्हणजे तुम्हीही तुमचे रिटर्न टार्गेट साध्य करू शकाल.
SIP म्हणजे काय? (SIP Investment)
SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. म्युच्युअल फंड एसआयपीत गुंतवणूक केल्यास आपल्याला दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळू शकतो. यामध्ये FD वा बँकेत केलेल्या इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळतो. कारण SIP मध्ये गुंतवणूक केल्यास चक्रवाढ परतावा मिळतो.
दरमहा किती गुंतवाल?
SIP मध्ये गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही दरमहा तुमच्या उत्पन्नातून केवळ १० हजार रुपये गुंतवले तरीही चालतील. सुमारे २० वर्षांसाठी तुम्ही ही गुंतवणूक चालू ठेवली तर कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही करोडपती होऊ शकता. तसेच दरमहा ही रक्कम २० हजार असेल तर फक्त १५ वर्षांत तुम्ही करोडो रुपयांचा निधी जमवू शकता. (SIP Investment) यात दर महिन्याला २५००० ची SIP केलात तर करोडपती होण्यासाठी तुम्हाला १३ वर्षे बस होतील. इतकेच काय तर तुमची कमाई चांगली असेल आणि सगळ्या खर्चानंतर तुमच्याकडे किमान ४० हजार रुपये शिल्लक असतील तर त्याची SIP करा. पुढच्या १० वर्षात तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीच रोखी शकणार नाही.
अवघ्या ५ वर्षात व्हाल करोडपती
एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न खूपच चांगले असेल आणि अशी व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये बाजूला करू शकते. हे पैसे प्रतिमाह SIP मध्ये गुंतवले तर करोडो रुपयांचा निधी जमा करण्यासाठी केवळ ५ वर्ष लागतात. (SIP Investment) कारण प्रत्येक महिन्याला १ लाख रुपयांची SIP मध्ये गुंतवणूक केल्याने ५ वर्षात १ कोटी रुपये जमा होतील. अशाप्रकारे SIP मध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये सहज कमावता येतील. मात्र यासाठी तुम्ही किती गुंतवणूक करता? हा घटक फार महत्वाचा आहे.