SIP Investment Plan | महिन्याला केवळ 1 हजार बचत करून बनाल करोडपती, जाणून घ्या भविष्यातील प्लॅन

SIP Investment Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SIP Investment Plan | खरंतर अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. परंतु मानव फक्त यावर अवलंबून न राहता तो नेहमीच जास्त पुंजी गोळा करण्याचा विचार करत असतो.आपण श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु नोकरी केली ते केवळ पगारावर घर चालते बाकी भविष्यातील स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु भविष्यात मोठी निधी गोळा करायची असेल, तर आपल्याला भविष्यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळेल.

तुम्हाला जर चांगले पैसे कमवायचे असेल, तर तुम्हाला योग्य रीतीने गुंतवणूक करणे, खूप गरजेचे आहे. तुम्ही दर महिन्याला केवळ एक हजार रुपयांची बचत करून देखील भविष्यात खूप चांगला निधी जमा करू शकता. यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. ती म्हणजे उत्पन्न तुम्हाला जेवढे उत्पन्न येते.त्याचा काही भाग आपल्याला वाचवला पाहिजे. आणि त्या बचत केलेल्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे.

आजच्या काळात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी हे गुंतवणुकीचे चांगले साधन आहे. त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. तुम्हाला जर जास्त काळासाठी गुंतवणूक करण्यात आपल्यासाठी ही खूप फायदेशीर ठरते. तुम्ही दर महिन्याला केवळ एक हजार रुपयाची छोटी बचत करून खूप दोन कोटींपेक्षा अधिक निधी जमा करू शकता.

दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा | SIP Investment Plan

एसआयपीमधील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला फायदा म्हणजे तुम्ही या गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे तुम्ही जर कमीत कमी वयात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.

तुम्हाला जर करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला ही बचत करावी लागेल. आणि ही रक्कम फंडात एसआयपी करावी लागेल. आपण जर पाहिली तर गेले काही वर्षात एसआयपीद्वारे मिळालेल्या परताव्यावर अनेक फंडांनी वीस टक्के पेक्षा अधिक परतावा दिला आहे. याची तुम्ही तीस वर्षे गुंतवणूक केल्यास तुम्ही दोन कोटींपेक्षा जास्त जमा होईल.

हेही वाचा – या 5 देशांमध्ये Valentine’s Day साजरी केल्यास होऊ शकते अटक; पण कारण काय?

एसआयपीच्या कॅल्क्युलेशननुसार आपण विचार केला तर तुम्ही जर दर महिन्याला एक हजार रुपयांची एसआयपी करत असाल, तर तीस वर्षानंतर तुम्हाला 3 लाख 60 हजार रुपये मिळेल पण जर तुम्हाला 20 टक्क्यांच्या दराने परतावा मिळाला, तर तुमचा फंड 2. कोटी 33 लाख 60 हजार एवढा मिळेल. जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळाला तर ही रक्कम जास्त होईल आणि तुम्हाला तुमचे पाहिजे ते ध्येय गाठण्यास मदत होईल.