SIP Investment : SIP मध्ये गुंतवणूक करायचीय?? पहा काय आहे प्रोसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SIP Investment | आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण पैशाची गुंतवणूक करत असतो. त्यासाठी विविध पॉलिसी, फंड्स आणि सरकारच्या बऱ्याच योजना आहेत . परंतु नेमकी गुंतवणूक कश्यामध्ये करायची हेच काहीजनांना समजत नाही. त्यामुळे अनेक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक होण्याच्या ऐवजी त्यांचे नुकसानच होते. आपण गुंतवलेले पैसे सुरक्षित असावे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला चांगला रिटर्न मिळावा अशी आपली इच्छा असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असा एक मार्ग सांगणार आहे ज्या माध्यमातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. या योजनेचं नाव आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP …. आता ही SIP म्हणजे काय? आणि यामध्ये गुंतवणूक कशी करावी याबाबत आज आपण जाणून घेऊयात….

SIP म्हणजे काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मधील गुंतवणूक ही आर्थिक जगतातील एक चर्चेचा विषय बनला आहे. SIP हे  म्यूचल फंडमधील गुंतवणूकदारांसाठी लोकप्रिय आहे. आता SIP म्हणजे नेमक काय? तर SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन होय. जे तुम्हाला तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंड योजनेत नियमित अंतराने थोडेसे पैसे गुंतविण्यास सक्षम करते. तसेच पैसे गुंतवणूक (SIP Investment) करण्यासाठी व ते सुरक्षित करण्यासाठी मदत करते.

SIP खाते कसे उघडायचे? SIP Investment

SIP खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदत्रे लागणार आहेत. ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही संलग्न करू इच्छित असलेल्या बँक खात्याच्या रद्द केलेल्या धनादेशाची प्रत, पासपोर्ट- आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स), आणि पत्ता पुरावा ज्यामध्ये तुम्हाला नवीनतम युटिलिटी बिले, बँक स्टेटमेंट, तुमच्या मालकाचे पत्र द्यावे लागणार आहे.

SIP खाते सुरु करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे KYC पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला केवायसीवर जावून SIP साईन अप करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडेल त्या फंडच्या SIP ची निवड करा. त्यानंतर तुम्हाला तारीख निवडायची आहे. हे केल्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमचे खाते ऍक्टिव्हेट केले जाते. तुम्ही भरलेला फॉर्म हा तुमच्याकडे आधीपासून डीमॅट खाते असल्यास तुम्ही तुमची SIP ऑनलाइन सबमिट करू शकता. तसेच तुम्ही ते पोस्ट ऑफिस किंवा बँकेद्वारे देखील पाठवू शकता. यामध्ये तुम्ही 500 रुपयापासून दर महिना गुंतवणूक (SIP Investment) करू शकता.