SIP Mutual Funds | पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर जरा थांबा ! या महत्वाच्या गोष्टी आताच घ्या समजून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SIP Mutual Funds | अनेकजण आजकाल त्यांच्या कमाईचा काही ना काही हिस्सा हा भविष्यासाठी गुंतवणूक करून ठेवतातमनजेणेकरून निवृत्तीनंतर त्यांच्या आयुष्य सुखकर होईल. त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर मुलांचे शिक्षण, लग्न या गोष्टी करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी येणार नाही. यासाठी गुंतवणूकदार अनेक नवनवीन योजना शोधत असतात. यामध्ये एसआयपी ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती असते.

कारण आजकाल अनेक व्यक्ती एसआयपीला (SIP Mutual Funds) प्राधान्य देताना दिसत आहे. परंतु यामध्ये काही प्रमाणात जोखीम देखील आहे. त्यामुळे अनेकजण यामध्ये गुंतवणूक करायला नको म्हणतात. परंतु तुम्ही जर अगदी पहिल्यांदाच एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. याची आज सविस्तर माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुमचे भविष्यात जाऊन कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसान होणार नाही.

एसआयपीमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा | SIP Mutual Funds

अनेकजण दुसऱ्याने केली म्हणून एसआयपीमध्ये पैसे गुंतवत असतो. परंतु जर तुम्हाला एसआयपीमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करायची असेल, तर त्याबाबत आधी तुम्ही अनेक गोष्टी सर्च केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सल्लागाराचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. कोणत्या फंडात पैसे गुंतवावे किंवा कोणत्या फंडात गुंतवू नये. जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे.

आजकालच्या काळात जर आपण पाहिले तर म्युच्युअल फंडातील (SIP Mutual Funds) गुंतवणुकी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करताना अत्यंत हुशारीने गुंतवणूक करा. अनेकवेळा गुंतवणुकीचा परतावा चांगला असतो त्या योजनेमध्ये आपण गुंतवणूक करतो. तरी देखील अशी गुंतवणूक करताना आधी त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही वेळाने गुंतवणूकदार ती गुंतवणूक थांबवतात किंवा मध्येच चालू करतात. असे केल्याने गुंतवणूकदारांना पूर्ण पैसे मिळत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान ही सहन करावे लागते.

एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना वेगवेगळ्या फंडांमध्ये किंवा सेक्टरमध्ये पैसे गुंतवावेत म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या अनुभव येईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या फंडातून परतावा मिळेल.

तुम्ही जर पहिल्यांदाच एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला सगळ्यात आधी ब्रोकेज ॲप निवडावे लागेल. तुम्ही चांगले ब्रोकेज ॲप शोधून त्याद्वारे गुंतवणूक करू शकता. त्यानंतर तुम्हाला केवायसीची प्रक्रिया असेल ती पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुमच्या ॲपमध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हिडिओ कॉलची केवायसी होईल. नवीन खाते नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. आणि त्यानंतरच तुम्ही एसआयपीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता.