क्रिकेटच्या पहिल्या देवाचा आज जन्मदिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सौजन्य – गूगल डूडल

उंच शरीरयष्टी, मैदानावर एन्ट्री केली की झपाझप पीच वर चालत जाण्याची पद्धत, नजाकतदार फटक्यांची लयलूट करण्याची आवड, सरासरीच्या बाबतीत अजूनही कुणाला तावडीत न सापडलेला, क्रिकेटशी अव्यक्त अशी आस्था आपल्या हयातभर जपलेला, उत्तम क्रीडा प्रशासक, निवडक आणि लेखक या भूमिका बजावणारा, देशांच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला क्रिकेटचा पहिला देव म्हणजेच सर डॉन ब्रॅडमन यांचा आज ११० वा वाढदिवस.

डोनाल्ड ब्रॅडमन यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स इथे झाला. ५ फूट ८ इंच उंचीच्या डॉनची शैली ही उजव्या हाताने फलंदाजी करण्याची करण्याची होती. १९२८ मध्ये पदार्पण केलेल्या डॉन ब्रॅडमन यांची खरी ओळख १९३० साली इंग्लंडसोबत झालेल्या अॅशेस मालिकेतून झाली. शतक, द्विशतक अन त्रिशतकांचा रतीब घालण्याचं काम डॉन करत होते. इंग्लंडची अॅशेस वरील सद्दी संपवण्यासाठीच जणू ब्रॅडमन यांचा जन्म झाल्याचं मानलं जातं होत. १९२९-३० च्या कालावधीत ऑस्ट्रेलिया आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या भयानक संकटातून जात असताना डॉनची फलंदाजी तमाम लोकांना यातून बाहेर पडण्याचं बळ देत होती. अॅलन किपाक्स आणि डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या जोडगोळीने एक काळ गाजवण्याचं काम १९२८-३३ च्या आसपास केलं. उसळत्या चेंडूंचा सामना करण्यात ब्रॅडमनला येत असलेल्या अडचणींचा विचार करुन गोलंदाजांनी Bodyline (बॉडीलाईन) नावाचं तंत्र विकसित केलं होतं. खेळाडूच्या शरीराला इजा करण्याच्या दृष्टीने चेंडू जाईल अशा पद्धतीने गोलंदाजी करण्याचं हे तंत्र होतं. स्वतःच्या बचावात्मक पवित्र्यात खेळाडू बाद व्हावा असं हे तंत्र होतं. यासोबत लेग थेअरी बॉलिंग तंत्रानेही डोनाल्ड ब्रॅडमनला त्रास दिला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हळुवार चेंडू टाकून त्याच दिशेला एखादा खेळाडू उभा करुन फलंदाजाला जाळ्यात ओढण्याच हे तंत्र बरंच परिणामकारक ठरलं होतं. या काळात ५ कसोटी सामन्यांत केवळ १३३ धावा काढणारा डॉन ब्रॅडमनही जगाने अनुभवला होता. परंतु हळुवार सुरुवात करून नंतर धावगती वाढविण्याचा प्रयत्न करणारा ब्रॅडमन जगाने शेफिल्ड मधील चौथ्या कसोटीत पाहिला आणि मग तिथून डॉनने मागे वळून पाहिलंच नाही. “माझा सरासरीच्या नियमावर विश्वास नाही, तुम्ही खेळत राहणं महत्वाचं आहे” असं ब्रॅडमन म्हणायचे.

शारीरिक व्याधींबद्दल बोलायचं झाल्यास अपेंडीक्स व पोटदुखीच्या आजाराने डॉन बऱ्याचदा त्रस्त झाला होता. त्याला लागणार रक्त भरण्यासाठी त्या काळी काही पत्रकारांनी ५ वा किंग जॉर्जलाही विनंती केली होती. सुदैवाने या आजारातून टप्प्या-टप्प्याने डॉन बरा झाला.

एकुणात डॉन विषयी लिहायला बरंच काही आहे, याचाच पुढील भाग आपण वाचूया आज रात्री ८ वाजता – डॉनच्या अधिक कारनाम्यांसाहित

 

Leave a Comment