हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sita Devi Temples) हिंदू देवतांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे विशेष दैवत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्यासोबत त्यांची अर्धांगिनी म्हणून माता सीतेचे देखील पूजन केले जाते. देशभरात अनेक श्री राम मंदिरे आहेत. ज्या ठिकाणी श्री राम यांच्या मूर्तीसोबत माता सीता, लक्ष्मण, हनुमंताचे देखील पूजन केले जाते. मात्र याच देशात माता सीतेची अशी काही अद्भुत आणि दुर्मिळ मंदिरे आहेत. जिथे प्रभू श्रीरामांशिवाय केवळ माता सीतेचे पूजन केले जाते. ही मंदिरे अत्यंत पुरातन आणि ऐतिहासिक आहेत. ज्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. उद्या १६ मे रोजी सीता नवमी आहे. यानिमित्त आपण सीता मातेच्या या दुर्मिळ मंदिराविषयी माहिती घेणार आहोत.
वायनाड स्थित देवी सीता मंदिर (Sita Devi Temples)
वायनाड हा भारताच्या केरळ राज्याच्या ईशान्येकडील जिल्हा आहे. जिथे देवी सीतेचे अत्यंत खास असे दुर्मिळ मंदिर आहे. जे हिरवीगार झाडीमुळे झाकलेले दिसते. या मंदिरात न केवळ सीता देवी तर तिची दोन्ही मुले अर्थात लव आणि कुश यांच्याही मूर्ती पहायला मिळतील. या मंदिराच्या सभोवतालचा परिसर अत्यंत शांत आणि निवांत आहे. त्यामुळे भाविक इथे येऊन प्रसन्न होतात. हे मंदिर सीतादेवी लवकुश मंदिर नावाचे प्रसिद्ध आहे. सकाळी ५ ते दुपारी १२:३० आणि संध्याकाळी ५:३० ते सायंकाळी ७:३० असं हे मंदिर भाविकांसाठी खुलं असतं.
नाशिक सीता गुंफा
महाराष्ट्रात नाशिक पंचवटी परिसरातील सीता गुंफा हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. (Sita Devi Temples) या ठिकाणी माता सीता भगवान राम यांच्यासह वनवासात राहिली होती. या ठिकाणी तुम्हाला ५ पवित्र वटवृक्ष दिसतात. या ५ वटवृक्षांमुळे या ठिकाणाला पंचवटी असे नाव मिळाले. इथे सीता गुंफेत जाण्यासाठी पायऱ्या पार कराव्या लागतात. या मंदिराची वेळ सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी आहे. नाशिक रेल्वे स्टेशनपासून ही गुहा केवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी कायम भाविकांचे येणे जाणे असते.
प्रभू श्री रामांशिवाय केले जाते देवी सीतेचे पूजन
मध्य प्रदेशातील अशोकनगरमध्ये कारिला स्थित मंदिर हे देवी सीता मातेचे विशेष आणि दुर्मिळ मंदिर आहे. कारण, इथे प्रभू श्री रामचंद्राशिवाय जानकी मातेचे पूजन केले जाते. या मंदिरात सीता माता आपल्या दोन्ही मुलांसह पुजली जाते. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. (Sita Devi Temples) असे मानले जाते की, जेव्हा भगवान रामाने माता सीतेचा त्याग केला त्या काळात माता सीता येथे वास्तव्यास होती. मात्र कालांतराने माता सीता जंगलात वसलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात वास्तव्यास गेली आणि या ठिकाणी तिने आपल्या दोन्ही मुलांचे लालन पालन केले.