हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माकपचे नेते सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन (Sitaram Yechury Death) झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी हे एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांना 19 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आणि पक्षाच्या संसदीय गटाचे नेते होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. येचुरी 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले आणि एका वर्षानंतर, ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) मध्ये सामील झाले. 1984 मध्ये त्यांना सीपीआय(एम) च्या केंद्रीय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले. 2015 मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. 1992 पासून ते CPI(M) च्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. त्यांना 2016 मध्ये राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये असताना त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ते सलग तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
Veteran CPI(M) leader Sitaram Yechury dies at 72 after prolonged illness: Party and hospital sources
— Press Trust of India (@PTI_News) September 12, 2024
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हंटल, सीताराम येचुरीजी माझे मित्र होते. ते भारताच्या कल्पनेचे संरक्षक होते आणि त्यांना आपल्या देशाची सखोल माहिती होती. मी आमच्या प्रदीर्घ चर्चाना आता मुकणार आहे. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.असं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.