Skin Fasting | त्वचेचा उपवास म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि घ्यावयाची काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Skin Fasting | आजकाल अनेकांच्या चेहऱ्यावरत पिंपल्स तसेच डाग येत असतात. ते डाग लपवण्यासाठी आपण मेकअप वापरत असतो. परंतु या मेकअपमुळे आपल्या त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. आपल्या त्वचेची चमक देखील निघून जाते. जर तुम्हाला देखील खूप पिंपल्स येत असतील तर तुम्हाला त्वचेच्या उपवासाची गरज आहे . आता तुम्ही म्हणाल की, आतापर्यंत जेवणाचा उपवास ऐकला होता. त्वचेचा उपवास नक्की काय असतो? तर आज आपण त्वचेचा उपवास म्हणजे नक्की काय असतो आणि त्याचे फायदे नक्की काय होतात हे पाहणार आहोत.

त्वचेचा उपवास म्हणजे काय? | Skin Fasting

त्वचेचा उपवास म्हणजे तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी सगळ्या स्किन केअर प्रॉडक्टपासून तुम्ही एक किंवा दोन दिवस ब्रेक घ्यायचा असतो. त्वचा डिटॉक्स होण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

ज्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी तेलकट, जंग फूड यासारख्या पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन दिवस कोणत्याही कोणत्याही केमिकल तुमच्या चेहऱ्याला लाव न लावण्याचा सल्ला दिला जातो.

आपण रोज स्किन केअर करत असतो. यामध्ये क्लिनिंग टोनर, मॉइश्चरायझर, सिरम नाईट क्रीम, सनस्क्रीन अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. परंतु यामुळे आपण आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या बरे होण्याची संधी देत नाही. जर तुम्हीही सगळी उत्पादने एक ते दोन दिवस लावली नाही तर त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला फरक दिसून येईल.

त्वचेचा हा उपवास कसा करावा?

रात्री झोपण्यापासून याची सुरुवात करावी. झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आणि तुमच्या चेहऱ्याला कोणतेही प्रॉडक्ट न वापरता तसेच झोपायचे आणि सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवायचा.

त्वचेच्या उपवासाचे फायदे | Skin Fasting

पिंपल्स दूर होतात

आपल्या त्वचेला अगदी लहान लहान छिद्र असतात. जेव्हा आपण हा त्वचेचा उपवास करतो. तेव्हा त्या छिद्रांना श्वास घेण्याची संधी मिळते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात. एवढेच नाही तर तुमच्या चेहऱ्याला ग्लो देखील येते. आपण लावलेल्या सगळ्या क्रीम्समुळे चेहऱ्यावरील छिद्र बंद होतात. त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नाही. परंतु हा उपवास केल्याने आपल्या त्वचेला फायदा होतो.

त्वचा सुधारण्यास मदत होते

आपण रोज मेकअप करत असतो. त्याचप्रमाणे केमिकल प्रॉडक्ट वापरत असतो. यामुळे आपल्या त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतात. आणि मृत त्वचेची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून ठेवण्यासाठी त्वचेचा उपवास करणे खूप गरजेचे असते

त्वचेचा टोन सुधारतो

आपण जर आपल्या त्वचेवर एक-दोन दिवस काहीच प्रॉडक्ट लावले नाही, तर त्यानंतर तुमच्या त्वचेच्या रंगातही बदल झालेला तुम्हाला दिसून येतो.

हेही लक्षात ठेवा

त्वचेचा उपवास (Skin Fasting) करताना आपण कोणतेही प्रॉडक्ट वापरत नाही. परंतु या दोन-तीन दिवसात तुम्ही उन्हात बाहेर जाणे देखील टाळा. नाहीतर तुमच्या त्वचेला जास्त तोटे होतील.

या त्वचेच्या उपवासाच्या वेळी दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने चेहरा धुवा आणि तो टॉवेलने पुसण्याऐवजी स्वतःच कोरडा होऊ द्या. त्याने देखील तुम्हाला चांगला फायदा मिळेल.