“नरेंद्र मोदींना दहशतवादी घोषित करा”; राम मंदिरावर लिहिली घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखले जाते. मात्र, त्यांना दहशतवादी घोषित करा(BBC), अशी घोषणा कॅनडामध्ये राम मंदिरावर लिहण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कॅनडामध्ये राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारता विरोधात घोषणा लिहिण्यात आल्याने याचा टोरंटो येथील भारतीय दूतावासाने तीव्र निषेध नोंदवला आहे. हा जो कोणी प्रकार केला असेल त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन दूतावासाने केले आहे.

कॅनडा मधील Mississauga येथे हे राम मंदिर आहे. राम मंदिरावर ‘पंतप्रधान मोदींना दहशतवादी घोषित करा’, ‘संत भिंडरावाला शहीद आहेत’, ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या प्रकारानंतर “राम मंदिरावर लिहिण्यात आलेल्या भारतविरोधी घोषणांचा निषेध भारतीय दुतावासाने ट्विट करत केला आहे. तसेच आम्ही कॅनडा प्रशासनाकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली असून गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असे ट्विटमध्ये भारतीय दुतावासाने म्हंटलं आहे.

कॅनडा येथील घडलेल्या प्रकारावर Brampton चे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. हा संभाव्य द्वेषपूर्ण गुन्हा आहे. तसेच प्रशासन हे अतिशय गांभीर्याने घेत आहे. या प्रकारचा 12 विभाग तपास करत असून जबाबदार लोकांना शोधलं जाईल. धार्मिक स्वातंत्र्य हक्क असून आणि आम्ही सर्वकाही करू. प्रत्येकजण त्यांच्या प्रार्थनास्थळी सुरक्षित असे याची आम्ही खात्री करू, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे.

कॅनडामधील पंतप्रधान तसेच भारताविरोधीत संदेश किंवा फोटो लावण्याची हि पहिली वेळ नसून यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. जानेवारी महिन्यात Brampton येथील हिंदू मंदिरावर भारतविरोधी फोटो लावण्यात आले होते. यामुळे भारतीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच टोरंटो येथील भारतीय दूतावासाने गौरी शंकर मंदिरात झालेल्या तोडफोडीचा निषेध केला होता.