आजकल अनेक लोकांच्या अशी इच्छा असते की, नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करावा. आणि त्यातून चांगले उत्पन्न घ्यावे. तुम्ही जर शेती करत असाल तरी देखील शेतीसोबत तुम्ही अशी काही व्यवसाय करू शकता. ज्यातून तुम्हाला खूप चांगले इन्कम मिळेल. आज आम्ही तुमच्यासोबत शेतीसंबंधीत अशा काही बिझनेस आयडिया (Small Business Ideas) शेअर करणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यातून तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट देखील मिळेल. आता आपण या व्यवसायांबद्दल जाणून घेऊया.
हायड्रोपोनिक रिटेल स्टोअर | Small Business Ideas
सध्या हायड्रोपोनिक या तंत्रज्ञानाचा वापर वेगाने होत आहेत. अनेक शेतकरी हे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. या टेक्नॉलॉजीमध्ये मातीशिवाय वनस्पती वाढवल्या जातात. केवळ पाण्याच्या साहाय्याने या वनस्पतींना मोठे केले जाते. या व्यवसायात तुम्ही एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे हायड्रोपोनिक उपकरणे विकू शकता. यामध्ये सेंद्रिय हरितगृहाची वाढ देखील चांगली आहे. कारण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या उत्पन्नाची मागणी देखील आजकाल जास्त प्रमाणात आहे. पूर्वी हा व्यवसाय अगदी कमी प्रमाणात केला जायचा. परंतु या व्यवसायाची वाढती मागणी पाहता, सेंद्रिय पद्धतीने ग्रीन हाऊस बांधण्यासाठी आता जमिनी देखील खरेदी करत आहेत.
बटाटा चिप्स उत्पादन
संपूर्ण जगभरात फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याच्या चिप्सची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. अशातच जर तुम्ही बटाटा चिप्सचा व्यवसाय सुरू केला, तर तुम्हाला खूप चांगला व्यवसाय करता येईल. यामध्ये खूप कमी भांडवल लागते आणि कमी भांडवलाची गुंतवणूक करून देखील खूप चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता.
प्रमाणित बियाणे विक्रेता | Small Business Ideas
पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीची बियाणे निवडणे देखील गरजेचे आहे. अशातच तुम्ही जर तुमच्या गावात चांगल्या दर्जाचे किंवा प्रमाणित बियाणे विकण्याचा व्यवसाय केला, तर या व्यवसायातून तुम्हाला खूप चांगला नफा मिळेल. यामध्ये जास्त भांडवल गुंतवण्याची देखील गरज नसते.
चहाच्या पानांची बाग
आज-काल देश आहे विदेशातून चहाच्या पानांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. जर तुम्ही चहाच्या मळ्यांचा व्यवसाय केला, तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. परंतु ही चहाची पाने वाढण्यासाठी हंगाम आणि जमिनीची निवड देखील महत्त्वाची असते. या व्यवसायात भांडवल जरा जास्त गुंतवणूक करावे लागले, तरी देखील यातून खूप चांगला नफा तुम्हाला मिळू शकतो.