औरंगाबाद |कोरोना महामारीमुळे मागील अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आले होते. यादरम्यान शाळा महाविद्यालय, बाजार, मार्केट, मॉल, रेल्वे, बस सर्व बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर हळूहळू कोरोनाचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. यामुळे शहरात शहर बससेवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात कोरोना निर्बंधांमुळे सध्या 51 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेस शहरात आणि आसपासच्या भागात 18 मार्गांवर सेवा देत असून ज्या मार्गांवर जास्त प्रवासी मिळतात, त्या मार्गांवर बसेसच्या जास्त फेऱ्या होतात. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत मनपने 100 बसेस विकत घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 51 बसेस सध्या मार्गांवर आहेत. तोच उर्वरित 49 बसेस तशाच उभ्या आहेत. आता या 49 बसेस कधी सुरु होतील सांगता येत नाही.
आतापर्यंत शहरात कोरोना निर्बंधांमुळे दुपारी चार वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात येत होती. परंतु आता नियम शिथिल करून 8 वाजेच्या नंतर संचारबंदी लावन्यात आलेली आहे. दरम्यान या संचारबंदीचा फटका शहरबसेसला बसत आहे. दुपारी चार वाजेनंतर ग्राहक मिळत नसल्यामुळे ज्या ठिकाणी ग्राहक दिसेल त्या ठिकाणी बसेस थांबवल्या जातात होत्या परिणामी शहर बससेवेला नुकसान सहन करावे लागले होते.शहरात दररोज या शहरबसेस 8 ते 10 हजार किलोमीटर फिरतात. या बसेसला एक किलोमीटर जाण्यासाठी साधारण 20 रुपये खर्च येतो. परंतु सध्या शहरबसेसला फक्त 16 ते 17 रुपये प्रति किमी कमाई होत आहे.
सध्या खालील मार्गावर सुरू आहे शहर बस –
शहागंज – रेल्वे स्टेशन
सिडको – रेल्वे स्टेशन
सिडको – रांजणगाव
मध्यवर्ती बस स्थानक – करमाड
औरंगपुरा – बजाजनगर
औरंगपुरा – वाळूज
औरंगपुरा – रांजणगाव
सिडको – वाळूज
औरंगपुरा – हिंदुस्थान आवास
नक्षत्रवाडी – हर्सुल सावंगी
आदी मार्गांवर शहरबससेवा सुरू आहे.