हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Snake Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये काही प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात. अगदी जंगली प्राण्यांपासून ते पाळीव प्राण्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेशीर तर काही थरकाप उडविणारे हे व्हिडीओ असतात. सापाचं नाव ऐकूनही घाम फुटणारे लोक व्हायरल व्हिडिओंमध्ये झूम करून करून साप पाहतात. कधी गाडीच्या चाकात तर कधी कुणाच्या घरात अचानक दिसणारा साप समजा तुमच्या टॉयलेटमध्ये दिसला तर काय कराल? विचारानेच घाबरायला होतंय ना? पण अशीच एक घटना घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
टॉयलेटमध्ये निघाला १० फूट लांब साप
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. (Snake Video) ज्यामध्ये चक्क १० फूट लांब साप एका टॉयलेटमधून बाहेर निघाल्याचे दिसत आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून एका व्यक्तीला टॉयलेटमध्ये गेला असताना सापाच्या फुसफुसण्याचा आवाज आला. त्यामुळे या व्यक्तीने टॉयलेटच्या आत नीट पाहिले तर त्याला साप असल्याचा अंदाज आला आणि त्याने तात्काळ सर्पमित्राला बोलावणे धाडले. यानंतर सर्पमित्र शीतल कासारने या धामण जातीच्या सापाची सुटका केली.
व्हायरल व्हिडीओ (Snake Video)
सर्पमित्र शीतल कासारने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दिसतंय की, एक साप हळूहळू टॉयलेटमधून बाहेर येत आहे. तो पूर्ण बाहेर येताच त्याची लांबी समजूत येतेय. सर्पमित्र शीतलने या १० फूट लांबीच्या सापाला आपल्या हातात पकडून घराबाहेर काढले.
हा (Snake Video) व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलंय, ‘हा साप धामण जातीचा असून, तो बिनविषारी आहे. तसेच या सापाची लांबी ९- १० फूट असून, तो प्रामुख्याने उंदराची बिळे, मनुष्य वस्तीत आढळतो’.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने म्हटलंय, ‘खूप भयानक आहे हे’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘मी असतो टॉयलेटमध्ये, तर माझं काय झालं असतं?’. तसेच अनेक नेटकरी सर्पमित्र शीतलच्या शौर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. (Snake Video)