… तर Petrol 15 रुपये लिटर मिळणार? गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टाइम्स मराठी । देशात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढलेले आहे. पेट्रोल डिझेल ही जीवनावश्यक वस्तू बनली असून याच्याच भरमसाठ किमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा एक दावा केला आहे ते ऐकून नक्कीच तुमचं मन खुश होईल. गाडीमध्ये 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीज वापरल्यास पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होऊ शकते असं विधान गडकरींनी केलं आहे. उदयपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सर्वसामान्य जनतेला परवडत नसल्यामुळे, आता लवकरच शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथेनॉलवर वाहने चालतील. शेतकरी फक्त अन्नदाता न राहता ऊर्जादाता देखील बनला पाहिजे. त्यानुसार सर्व वाहन शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथेनॉल वर चालतील. वाढते प्रदूषण आणि तेल आयात कमी करण्यासाठी सरासरी 60% इथेनॉल आणि 40% वीज घेतल्यास पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल आणि लोकांना त्याचा फायदा होईल. सध्या इंधनाची आयात १६ लाख कोटी रुपयांची असून ती कमी केल्यास हा पैसा परदेशात पाठवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल असं त्यांनी म्हंटल.

ऑगस्ट महिन्यामध्ये टोयोटा कंपनीच्या गाड्या लॉन्च करत आहे. या गाड्या इथेनॉल वर चालतील. यामुळे लोकांचं भलं होईल आणि ही आपल्या सरकारची किमया आहे. असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. तसेच तरुणांसाठी दहा करोड नोकऱ्या मिळतील असे आश्वासनही त्यांनी दिले. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा टर्न ओव्हर 7.5 लाख करोड एवढा आहे. त्यापैकी साडेचार करोड तरुणांना नोकरी देण्यात येईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत नऊ वर्ष बरेच विकासात्मक पाऊले उचलून देशाची प्रगती केली आहे असा म्हणत गडकरींनी मोदींचेही कौतुक केलं.