तर मग आम्ही जयंत पाटलांना ऑफरबाबत सल्ला द्यायचा का? राणेंचा मिटकरींवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे याना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली होती. भाजप तुमचे पंख छाटण्याचे काम करत असून जस रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तशी पाऊले तुम्ही उचला असं आवाहन पंकजा मुंडे याना केलं. याबाबत भाजप आमदार नितेश राणे याना विचारलं असता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव घेत मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ ही आरक्षित विशेष रेल्वे सोडण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, अमोल मिटकरींनी दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते पदावरून काय चाललं आहे ते आधी त्यांनी पाहावं. अमोल मिटकरींसारखंच आम्ही जयंत पाटील यांना ऑफरबाबत सल्ला द्यायचा का असं म्हणत स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून असं अमोल मिटकरींनी करू नये असा टोला नितेश राणे लगावला.

यावेळी त्यांनी अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांच्या तिरंगा नाकारल्याच्या व्हिडिओ वरूनही त्यांची पाठराखण केली. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना देशभक्ती शिकवण्याची कोणाला काहीही गरज नाही. एखाद्याने देशाचा झेंडा हाती घेतला नाही म्हणजे त्या व्यक्तीचे देशावर प्रेम नाही, असे कुठं लिहीलं नाही. कोणाचे देशावर किती देशप्रेम आहे याबद्दल आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं नितेश राणे यांनी म्हंटल.