इस्रोची आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी! विक्रम लँडरचे नविन भागात सॉफ्ट लँडिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यानंतर आता आणखीन एक इस्रोकडून आनंदाची बातमी आली आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाल्यानंतर त्याने 40 सेंटीमीटर उंचीवर उडी मारली. यानंतर त्याने 30 ते 40 सेंटीमीटर अंतर कापत पुन्हा सॉफ्ट लँडिंग केले आहे. याची माहिती इस्रोकडून ट्विट करत देण्यात आली आहे. यातूनच चंद्रयान 3 त्याच्या लक्षा पेक्षा अधिक चांगली कामगिरी करत असल्याचे दिसत आहे.

23 ऑगस्टपासून विक्रम लँडरने आपले काम करण्यात सुरूवात केली आहे. विक्रम लँडरकडून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो देखील पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा विक्रम लँडरने एक कौतुकास्पद बाब घडवून आणली आहे. विक्रम लँडरचे कमांड दिल्यानुसार इंजिन सुरू झाली आहे. यावेळी त्याने हवेत 40 सेंटीमीटर उडी घेतली. त्यानंतर, 30-40 मीटर अंतरावर नवीन ठिकाणी सॉफ्ट लँडिंग केले. इस्रोच्या माहितीनूसार, लँडरचे सर्व पार्ट व्यवस्थित रित्या काम करत आहेत.

नवीन ठिकाणी झेप घेण्यापूर्वी विक्रम लँडरचे काही भाग बंद करण्यात आले होते. सॉफ्ट लँडिंगनंतर त्यांना पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व भाग व्यवस्थित काम करत आहेत. ज्यामुळे इस्त्रोला चंद्राचा अभ्यास करण्यास जास्त वाव मिळत आहे. ज्या भागात लँडर आहे तेथे 14-15 दिवस सूर्यप्रकाश असणार आहे. नंतर अंधार पडल्यास सुरूवात होईल. यासाठीच लँडर आणि रोव्हरमध्ये सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत. जे सूर्यापासून ऊर्जा घेऊन बॅटरी चार्ज करतील. 14-15 दिवसांनी सूर्योदय झाल्यानंतर विक्रम लँडर काम करण्यास पुन्हा सक्रिय होईल.