हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यंदा दरवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक शेतीच्या कामांना देखील चांगलाच वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळसूदृश्य परिस्थिती जरी निर्माण झालेली असली, तरी शेतकरी मात्र आता शेतीच्या कामाला लागलेला आहे. शेतांसाठी लागणारे खत, बी बियाणे या सगळ्याची तयारी चालू आहे. अशातच आता पुन्हा एकदा कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या कंपनीवर कारवाई केलेली आहे. त्या कंपनीने शेतकऱ्यांना बोगस डीए खतांची विक्री केलेली आहे. या खताच्या नावाखाली त्यांनी बॅगमध्ये माती विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
अमरावती कृषी विभागाने शेतकऱ्यांना खताऐवजी माती दिल्याचा प्रकार उघडकीस आणलेला आहे. त्यामुळे आता बोगस खते आणि बियाणे विकणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरू झालेली आहे. आणि या लोकांवर कड क कारवाई करण्याची आता मागणी केली जात आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. एका कृषी केंद्रातील खतांचे नमुने घेतले. त्यावेळी त्या खता ऐवजी माती असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील खत निर्मिती कंपनी रामा फर्टीकॅम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यामध्ये 322 आणि 10 : 26. : 26 या खताच्या 2100 बॅक अशा 5400 खतांच्या बॅगांची विक्री केलेली होती. परंतु यामध्ये वेगळे नमुने आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालेले आहे.त्यांनी या खतांऐवजी बॅगमध्ये माती भरून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
आता या कंपनीची जवळपास 453 खताची पोती जप्त करण्यात आलेली आहे. आणि त्यावर अमरावती शहरांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. या खताची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि व्यक्ती वरती कारवाई करण्यात यावी, असे अमरावती कृषी विभागाने सांगितले आहे.
या आधी देखील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आलेले होते. आणि त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली होती. परंतु आता अमरावतीमध्ये घडलेल्या खळबळजनक प्रकाराने सगळे शेतकरी जागरूक झालेले आहेत. आणि बनावट खत विकणाऱ्या कंपन्यांवरही आता बंधन आलेली आहेत.