राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षण संस्थेतल्या शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार (abuse) केल्याचा गुन्हा सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर करण्यात आला आहे. ही बाब मनोहर सपाटे यांना समजतात ते पळून गेल्याने त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित महिला (abuse woman) ही विधवा असून ते सपाटे यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत होती. याच दरम्यान सपाटे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडले होते. या गोष्टीला तिने विरोध केला असता संस्थेतून काढून टाकण्याचे त्याचबरोबर तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची भीती तिला दाखवली.

या त्रासाला कंटाळून या विधवा महिलेने एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र तेव्हा तिथे तिच्यावर दबाव आणून गुन्हा मागे घेण्यास तिला भाग पाडले. आणि आता तिचा राजीनामा घेऊन निवृत्तीचे पैसे त्याचबरोबर जमिनीच्या व्यवहारातील पैसे असे एकूण दहा लाख रुपये तिच्याकडून जबरदस्तीने वसूल करून घेतल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर तसेच फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!