Tuesday, January 31, 2023

‘पाटलांच्या पोरांना लग्ना आधी सुध्दा पोर असतात…’; राष्ट्रवादीच्या नेत्याची जीभ घसरली

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय नेत्यांचा एकमेकांवर टीका करताना तसेच सभांमध्ये बोलताना तोल सुटला जात आहे. नुकतेच शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्त्यामुळे अडचणीत सापडले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. “पाटलांच्या पोरांना लग्नाआधीसुद्धा पोरं असतात, आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे,” असे विधान पाटील यांनी केले आहे.

माजी आमदार राजन पाटील यांनी पंढरपूरच्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत प्रचारास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भर सभेत भाषण केले. “आमच्या पोरांना वयाच्या 17व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे पाटील यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल सोमवारी लागणार आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये मागच्या 10 वर्षांपासून कोल्हापूरचे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत महाडिक यांना राष्ट्रवादीचे उमेश पाटील, भागीरथ भालके, काँग्रेसचे स्थानिक नेते, तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा पाठिंबा आहे. महाडिक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजन पाटील आहेत.