सोलापूरकरांनी अनुभवलं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’, सोलापूर विज्ञान केंद्राकडून आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । आज खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूर विज्ञान केंद्राकडून सोय करण्यात आली होती. यावेळी सोलापूरकरांनी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण, गॉगल यावेळी ठेवण्यात आले होते. सकाळी ९ नंतर हे सूर्यग्रहण सोलापूरकरांना पाहायला मिळालं. देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसत असताना सोलापूरमध्ये मात्र खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं.

सकाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे हे सूर्यग्रहण लोकांना पाहता येईल की नाही अशी शंका वाटत असतानाच वातावरणात बदल झाल्याने उघड्या डोळ्यांनीही सुर्यग्रहणाच्या कला लोकांना पाहता आल्या. सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत हे सूर्यग्रहण लोकांना पाहता आलं. यावेळी सामान्य नागरिक, खगोलप्रेमी, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment